Posts

Showing posts from June, 2024

खबरदारी हीच सुरक्षितता!

Image
खबरदारी हीच सुरक्षितता! पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. पावसाळ्यात विद्युत अपघाताचा धोका अधिक असल्याने घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून अधिक सावध राहणे आवश्यक आहे. वीज दिसत नाही पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सतर्कता व योग्य खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे. पाणी हे विजेचे वाहक असल्याने विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने खबरदारी घ्यावी. विशेषत: मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व महावितरणच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये. ओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत. ही उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर ठेवावीत. जेणेकरुन त्यात पावसाचे पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणे ओलसर झाले असल्यास ते त्वरित बंद करून प्लगसह बाजूला करावे. तसेच पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा इतर वीज यंत्रणेला बांधू नये. मेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी घराच्या